चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाची सुरूवात होते. खरसई गावात गुढी पाडवा साजरा केला जातो.वर्षाचा पाहिला सण या दिवशी प्रत्येकाच्या अंगणात गुढी उभारली जाते. याची तयारी एक दोन दिवस आधीपासुन सुरूवात होते. गुढी उभारन्यासाठी लागणारा बांबू एक दोन दिवस आधीपासून आणून ठेवला जातो. पाडव्याच्या दिवशी हा बांबू स्वच्छ धुऊन त्यावर वस्त्र,हार,कडूलिंबाची पाने त्यावर तांब्या ठेऊन विधिवत पुजा केली जाते. गावातील आळी मंडलांच्या तसेच मंदिरांसमोर जीबीगुढी ऊभी करतात तिला “महादेव काठी”म्हणतात. यासाठी उंच बांबू निवडला जातो. खालू बाजाच्या साथिने व सनईच्या सुरात महादेव काठी गुंफन्याची प्रक्रिया सुरू होते.
सुरुवातीला बांबू स्वच्छ धुतला जातो मग त्यावर लाल रंगाची पगडी नेसवली जाते. लाल रंगाच्या कपडयावर सफेद रंगाची पट्टी बांधली जाते. काठीच्या शेंडयाला मोरपीसं व आळीच्या नावाचा भगवा ध्वज बांधला जातो. काठीच्या शेंडयापासून बुंधापर्यंत रंगबेरंगी पताका (भावटे) लावली जातात. शेवटी हि काठी नाचवताना मंजुळ आवाजासाठी घुंगुर बांधतात अशा रितिने महादेव काठी सजवली जाते.

सजलेली काठी नाचवण्यासाठी गावातील तरुण सर्वार्थाने पुढे असतात. 20-25 फुट उंचीची काठी हातात धरुन तोल सावरत नाचवने हि एक कला आहे. सर्वाना जमेल अस नाही. हा एक मर्दानी खेळाचा प्रकार आहे. या साठी लागतो प्रचंड ऊर्जा अन उत्साह…! अशा रितीने विधिवत पुजा करून हि काठी स्थानावर विराजमान केली जाते. पाडव्याला गावात प्रत्येकाकडे गोडधोड बनवले जाते. तर गावाची एकात्मता अखंडता टिकऊन ठेवन्यासाठी सण साजरे केले जातात. वर शेंडयावर जरी भगवा डौलाने फडकत असला तरी…
सजवट मात्र विविधत रंगच्या कपड्याने होते… हीच खासियत आहे… खरसईकरांच्या प्रत्येक सणाची… विविधतेत एकता…

शब्दांकन : रायगड भूषण हेमंत भाऊ पयेर underwater fauna.


